आसाम,
assam-indian-soldier-missing-bangladesh-borderआसामच्या भारत आणि बांगलादेश सीमेवर धक्कादायक घटना घडली. थेट सीमेवरून भारताचा सैनिक बेपत्ता झाला. त्याचा शोध घेतला जात आहे. त्यातच स्थानिक नागरिकांनी मोठा दावा केला. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, भारतीय सैनिकाचे बांगलादेशकडून अपहरण करण्यात आले. पशु तस्करांचा पिच्छा करताना या सैनिकाने थेट नदीत उडी मारली. यासोबतच अजून एका सैनिकाने नदीत उडी मारली होती. आता या सैनिकाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता सैनिकाची ओळख के.वेणु झाली. तो आमामच्या कछारच्या कटिगोरा येथील हरिनगर बॉर्डरवर तैनात होता. यावेळी त्याच्यासोबत कांस्टेबल जितेंद्र यादव देखील होते. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली की, हरिनगर सीमेजवळ चार ते पाच लोक प्राण्यांची तस्करी करत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर या लोकांना पकडण्यासाठी हे दोन सैनिक गेले.
यानंतर या लोकांचा पिच्छा करताना दोन्ही भारतीय सैनिकांनी नदीत उड्या घेतल्या. नदीत उडी घेतल्यानंतर जितेंद्र यादव सुरक्षित बाहेर आले. पण के वेणु नदीतून बाहेर आलेच नाही. यानंतर BSF कमांडरने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. या बेपत्ता सैनिकाला शोधण्यासाठी SDRF, NDRF आणि स्थानिक पोलिस घेत आहेत. मात्र, या सैनिकाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
या सैनिकाच्या शोधासाठी प्रत्येक प्रयत्न केली जात असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. यादरम्यानच स्थानिक लोकांनी सैनिकाचे अपहरण झाल्याचा दावा केला. मात्र, BSF च्या अधिकाऱ्यांनी अपहरण झाल्याच्या मुद्द्यावर भाष्य करणे टाळले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत बांगलादेश सीमेवरून स्थानिक शेतकऱ्याचे अपहरण बांगलादेशकडून करण्यात आले होते.
रंजीत दास वय 65 असे शेतकऱ्याचे नाव आहे. 12 तासानंतर या शेतकऱ्याची सूटका करण्यात आली. त्यामुळे या सैनिकाचेही अपहरण झाले असावे, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवरील तणाव वाढला आहे.