नवी दिल्ली,
china-satellite-pahalgam-attackजम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी चिनी उपग्रहाने तब्बल ३७ वेळा कक्षा बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. पहलगाम हल्ल्याच्या आधी आणि त्याच्या आसपासच्या दिवसांत चीनच्या अनेक उपग्रहांनी आपल्या कक्षेत असामान्य स्वरूपाचा बदल केला होता, असे विश्लेषण बंगळुरूतील अंतराळ निगराणी कंपनी दिगंताराने केले.
चीनच्या या अंतराळातील हालचालींची वेळी अत्यंत महत्त्वाची होती. असे असले तरी चिनी उपग्रहाच्या मदतीने पहलगाम हल्ल्याची योजना तयार करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याचा अजून ठोस असा पुरावा काही मिळालेला नाही. मात्र, चीनच्या या हालचाली भारताच्या अंतराळ सुरक्षा आणि गुप्त सर्व्हेलन्सच्या क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
दिगंदाताने १५ एप्रिल पासून ३० एप्रिल २०२५ पर्यंतच्या चीनच्या एकूण १,३३२ अंतराळ उपकरणांच्या हालचालींचा अभ्यास केला होता. यात उपग्रह आणि इतर अंतराळ वस्तूंचा समावेश आहे. या विश्लेषणानुसार १९० अंतराळ उपकरणांनी या कालावधीत किमान एकवेळा कक्ष बदलली होती. त्यापैकी ३७ उपकरणांच्या हालचालींचा तपास करणे गरजेचे झाले
या काळात पहलगाम आणि त्याच्या जवळपासच्या भागात चिनी उपग्रहांची नजर असण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. सामान्य परिस्थितीत हे उपग्रह आपल्या ठरलेल्या कक्षेत पृथ्वीची प्रदक्षिणा करत असतात. त्यांची गती उंची पृथ्वीच्या वरून जाणारा त्यांचा मार्ग पहिल्यापासून ठरलेला असतो.
कक्षेत बदल केलेला उपग्ह एखाद्या खास भागावरून पूर्वीपेक्षा जास्त वेळा जाऊ शकतो. त्यामुळे त्याला या भागाची जास्त छायाचित्रे घेता येतात. हालचालींचा अभ्यास करणे आणि संभाव्य रणनैतिक माहिती गोळा करण्याची अधिक संधी मिळते.
‘याओगन’ची पहलगावरून जाण्याची फ्रिक्वेन्सी दुप्पट
सर्वांत महत्त्वाची घटना १६ एप्रिल २०२५ रोजी घडली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. म्हणजे या हल्ल्याच्या सहा दिवस आधी चीनच्या याओगन-३५-०१ ए या उपग्रहाने कक्षेत बदल केला होता. या बदलाअंतर्गत या उपग्रहाची पहलगामच्या वरून जाण्याची फ्रिक्वेंसी जवळपास दुप्पट झाली होती. या उपग्रहाला या भागाचे निरीक्षण करण्यासाठी तुलनेने जास्त संधी मिळाली होती. याओगन-३५-०१ ए हा अधिकृतरित्या पृथ्वीच्या निरीक्षणासंदर्भातील उपग्रह मानला जातो. मात्र जाणकारांनी या उपग्राहाचा वापर ‘सिग्नल इंटेलिजन्स’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स’मध्ये वापर केल्याचा दावा आहे.
हल्ल्यावेळी दोन उपग्रह सक्रिय
ज्या दिवशी पहलगाम हल्ल्याच्या दिवशी चीनच्या याओगन-३९-०१ बी आणि याओगन-३९-०१ सी या दोन उपग्रहांनीही कक्षेत असाधारण बदल केला होता. पहिल्या उपग्रहाने सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी आणि दुसऱ्या उपग्रहाने सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी आपली कक्षा बदलली होती. हे दोन्ही बदल हल्ल्यानंतरचे होते. या उपग्रहाची विशेष बाब म्हणजे हे दक्षिण आशियाच्या मोठ्या भागाचे सर्व्हेलन्स करण्यास सक्षम आहेत. यांच्या सर्व्हेलन्स क्षेत्रात भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि हिंदी महासागरासोबतच चीनच्या आसपासच्या काही भागांचा समावेश आहे. कक्षेत बदल केल्यानंतर निगराणी कक्षा ही पहलगामपासून श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि जम्मूपर्यंत वाढते.