लक्ष्मी वसाहतीत सामूहिक तुलसी विवाह सोहळा

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
आरमोरी,
tulsi vivah ceremony शहरातील शक्तीनगर परिसरातील लक्ष्मी वसाहतीत 22 नोव्हेंबर रोजी सामूहिक तुलसी विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण वसाहतीत धार्मिक आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्यासाठी वसाहतीतील महिलांनी घराघरांतील तुलसी वृंदावने एकत्र आणली होती.
 

tulsi vivah ceremony 
 
आकर्षक सजावट व साजशृंगार करून तुलसी वृंदावनांना वधूप्रमाणे सजविण्यात आले होते. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास शेकडो महिला-पुरुषांच्या उपस्थितीत वाजतगाजत पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह पार पडला.
तुलसी विवाहादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.tulsi vivah ceremony या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमांचीही जोड देण्यात आली. कार्यक्रमाला बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी चौलावार, सेवानिवृत्त क्षेत्रसहायक भोयर, अनिल दहीकार, हेमंत निखारे, रमेश बोनपवार, निखिल धकाते, हरिश्‍चंद्र बोंदरे, राऊत, बोदेले, राजवाडे, मुख्याध्यापक श्रीपाद वठे उपस्थित होते. यशस्वितेसाठी मयूर दहीकार, सुमित नंदनवार, अंकुश बोनपवार, साक्षी नंदनवार, दीप भेंडारकर, दादू कोहाडे यांनी सहकार्य केले.