8 कोटी कर्मचार्‍यांसाठी वर्षाअखेर आनंदवार्ता

UPI च्या माध्यमातून एका मिनिटात PF काढता येणार

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
epfo-pf-withdrawal-upi-2026देशातील 8 कोटींहून अधिक नोकरदारांसाठी आनंदवार्ता आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने-ईपीएफओची खास सुविधा लवकरच सुरू होत आहे. UPI च्या माध्यमातून PF ची रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा या डिसेंबर 2026 च्या अखेरीस सुरू होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. EPFO 3.0 मधील बदलाचा हा भाग आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही सुविधा सुरू होणार होती. पण तांत्रिक अडचणी आणि चाचणी प्रक्रियेत मोठा वेळ गेला. त्यामुळे ही सुविधा अद्याप सुरू झाली नाही. मात्र या वर्षाच्या अखेरपर्यंत या सुविधेला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.
 

EPFO 
आतापर्यंत पीएफचे पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या पोर्टलवर जाऊन क्लेम करावा लागत होता. त्यानंतर खात्यात रक्कम जमा होईपर्यंत एक आठवडा तर कधी कधी 15 दिवस लागत होते. कागदपत्रांमध्ये एक छोटीशी चूक झाली तरी क्लेम नाकारल्या जात होता आणि ही प्रक्रिया पुन्हा करावी लागत होती. आता नवीन प्रक्रियेत ही सर्व प्रक्रिया कालबाह्य ठरली आहे. माहितीनुसार, ही सुविधा तुमचा UAN क्रमांक आणि UPI खात्याशी जोडलेली असेल. सुरुवातीला ही सुविधा BHIM प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध होणार आहे.
तुमच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. खात्यात किती रक्कम शिल्लकी ठेवावी लागेल आणि तुम्हाला किती रक्कम काढता येईल याची माहिती लागलीच कळेल. यापूर्वी पीएफमधून 25 टक्के आंशिक रक्कम काढता येत होती. खात्यात 75 टक्के रक्कम ठेवावी लागत होती. 19 नोव्हेंबरला ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्यानुसार, 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. यामुळे गरजेच्या वेळी कर्मचाऱ्याला पैसे काढता येतील. ईपीएफओने आता पीएफ काढण्याचे जुने 13 नियम रद्द केले आहे. आता तीन सोप्या श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, अत्यावशक गरजा जसे की लग्न, शिक्षण, आजार यांचा एक गट, दुसऱ्या श्रेणीत घर खरेदी, बांधकाम, कर्ज परतफेड यांचा समावेश आहे. तिसऱ्या श्रेणीत नोकरी जाणे, कारखाना बंद होणे, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे. ही सुविधा वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांचा UAN हा क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे.