सव्वा लाखाच्या घरात पोहचलं सोनं!

२०२८ पर्यंत सोन्याच्या दारात किती वाढ?

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
Gold Price Prediction 2028मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. सोन्याच्या दराने या वर्षी जानेवारी महिन्यात दराचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. आपल्या विक्रमी उच्चांकापासून सोनं जवळपास २९ टक्के स्वस्त झालं आहे. सोन्याच्या भावात मोठा उलटफेर झाल्याने गुंतवणूकदारा हवालदिल झाले आहेत. तर, सामान्य ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
 

gold prediction 
सोन्याचे दर येत्या दोन वर्षात कोणता नवीन दर गाठणार, याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.
वर्षाच्या सुरुवातीला गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी आता मोठी कोलांटउडी घेतली आहे. २०२६ या आर्थिक वर्षात उच्चांकी दरावरून सोनं तब्बल ५४ हजार रुपयांनी, तर चांदी तब्बल २ लाख ४८ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. या ऐतिहासिक घसरणीनंतर आता सोनं आणखी स्वस्त होणार की पुन्हा उसळी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोन्याच्या दराबाबत आघाडीची गुंतवणूक बँक 'गोल्डमन सॅक्स'ने मोठा अंदाज वर्तवला आहे.
सध्या सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. मात्र, ही घसरण तात्पुरती असल्याचे एक्सपर्टने म्हटले आहे. येत्या दोन वर्षांमध्ये सोन्याच्या दरात पुन्हा उसळण येणार असल्याचं भाकीत गोल्डमन सॅक्सने वर्तवलं आहे. पुढील वर्षाच्या २०२७ च्या अखेरीस सोन्याचा भाव वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत २०२७ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ४,६५० डॉलर प्रति औंस (३१.१० ग्रॅम) पर्यंत जाऊ शकतं. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं तर, १ तोळा (१० ग्रॅम) सोन्याचा दर १ लाख ३८ हजार ९११ रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑक्टोबरमधील सरासरी दराच्या तुलनेत ही १३ टक्के वाढ असणार आहे.