अभिनयाचा वारसा सोडून ऋतिकपुत्राची संगीताच्या दुनियेत भरारी

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
मुंबई
hrehaan roshan
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याचा मोठा मुलगा रेहान रोशन सध्या आपल्या संगीताच्या आवडीमुळे चर्चेत आला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याऐवजी रेहानने संगीताची वाट निवडली असून, वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी त्याने स्वतंत्र संगीतकार आणि गायक म्हणून आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच त्याने आपले तिसरे गाणे 'बटरफ्लाय ब्लड' प्रदर्शित केले. या गाण्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याच्या गायनाचे आई सुजैन खान आणि आजोबा राकेश रोशन यांनीही कौतुक केले आहे. वारसा सोडून ऋतिकपुत्राची संगीताच्या दुनियेत भरारी




मुंबई
hrehaan roshan बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याचा मोठा मुलगा रेहान रोशन सध्या आपल्या संगीताच्या आवडीमुळे चर्चेत आला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याऐवजी रेहानने संगीताची वाट निवडली असून, वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी त्याने स्वतंत्र संगीतकार आणि गायक म्हणून आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच त्याने आपले तिसरे गाणे 'बटरफ्लाय ब्लड' प्रदर्शित केले. या गाण्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याच्या गायनाचे आई सुजैन खान आणि आजोबा राकेश रोशन यांनीही कौतुक केले आहे.

ऋतिक रोशन हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे वडील राकेश रोशन यांनीही आपल्या काळात अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळवली होती. पुढे त्यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही यशस्वी कारकीर्द घडवली. त्यामुळे ऋतिकच्या चाहत्यांना त्याच्या दोन्ही मुलांनीही अभिनय क्षेत्रात यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, ऋतिकचा मोठा मुलगा रेहान याने अभिनयाऐवजी गायन आणि संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेहानने यंदा ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र कलाकार म्हणून संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्याचे पहिले 'दिस हेवनली प्लेस' हे गाणे प्रदर्शित झाले होते. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी त्याने 'एव्हरी लिटल थिंग' हे दुसरे गाणे रसिकांसमोर आणले. आता त्याचे तिसरे 'बटरफ्लाय ब्लड' हे गाणेही प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने हे गाणे आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले होते. त्यानंतर स्वतः हे गाणे गातानाचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला.

या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेहानची आई सुजैन खान हिने लाल रंगाचे हार्ट आणि फुलपाखराचे इमोजी शेअर करून त्याचे कौतुक केले. तर आजोबा राकेश रोशन यांनी 'लगे रहो रे (रेहान)' अशी प्रतिक्रिया देत नातवाला प्रोत्साहन दिले. कुटुंबीयांकडून मिळालेल्या या कौतुकाच्या थापेसोबतच अनेक चाहत्यांनीही रेहानच्या गायनाचे अभिनंदन केले आहे.

रेहान यापूर्वीही सोशल मीडियावर आपले गायनाचे व्हिडिओ नियमितपणे शेअर करत आला आहे. विशेष म्हणजे त्याची बहुतांश गाणी इंग्रजी भाषेत आहेत. नव्या व्हिडिओवरही चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या आवाजाचे आणि सादरीकरणाचे कौतुक केले, तर काही चाहत्यांनी त्याने हिंदी गाणीही गाण्याचा प्रयत्न करावा, अशी इच्छा व्यक्त केली. एका नेटकऱ्याने हिंदीमध्ये गाणी लिहून आणि गाऊन सादर केल्यास अधिकाधिक लोकांना त्याच्या संगीताशी जोडले जाता येईल, असे मत व्यक्त केले. अन्य एका चाहत्याने त्याच्या गायनाचे कौतुक करत त्याला हिंदी गाणी गाण्याचा सल्ला दिला. काहींनी त्याला भविष्यात उत्तम गायक होण्यासाठी शुभेच्छा देत संगीत क्षेत्रातील प्रवास सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २००० मध्ये विवाह केला होता. या दाम्पत्याला रेहान आणि रिदान अशी दोन मुले आहेत. रेहान सध्या २० वर्षांचा, तर धाकटा मुलगा रिदान १८ वर्षांचा आहे. विवाहानंतर १४ वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये ऋतिक आणि सुजैन यांचा घटस्फोट झाला. मात्र, विभक्त झाल्यानंतरही दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत. मुलांच्या संगोपनासाठीही ते एकमेकांना सहकार्य करताना दिसतात.

अलीकडेच ऋतिकने सुजैनच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. दोन्ही मुलांचे संगोपन उत्तम प्रकारे केल्याबद्दल त्याने सुजैनचे कौतुक करत तिला एक चांगली आई असल्याचे म्हटले होते. सध्या ऋतिक अभिनेत्री सबा आझाद हिच्यासोबत नात्यात आहे, तर सुजैन खान अभिनेता अर्सलान गोनी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. घटस्फोटानंतरही दोघांनी आपले वैयक्तिक आयुष्य स्वतंत्रपणे पुढे नेत मुलांशी आणि एकमेकांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध जपले आहेत.