आज इंडियासाठी 'करो या मरो' सामना

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
india-a-vs-uae-liveआशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील इंडिया अ संघाचा अखेरचा साखळी सामना मंगळवारी युएईविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. मात्र, पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याच्या निकालावरही उपांत्य फेरीचे समीकरण अवलंबून असेल. दरम्यान, भारत-अ विरुद्ध युएई सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वीचे दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू झाले होते. मात्र, युएईविरुद्धचा सामना आता सकाळी खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सामना नेमका किती वाजता सुरू होणार, त्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या वाहिनीवर होणार आणि लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार, जाणून घ्या.

india 
टीम इंडिया विरुद्ध युएई सामना किती वाजता सुरू होणार?
टीम इंडिया आणि युएई यांच्यातील सामना मंगळवारी दोहा येथे खेळवण्यात येणार आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सकाळी 11:30 वाजता सुरू होणार असून, नाणेफेक सकाळी 11 वाजता होईल.
टीम इंडिया विरुद्ध युएई सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेचे भारतातील थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जात आहे. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध युएई सामन्याचे थेट प्रक्षेपणही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहता येईल.
लाइव्ह स्ट्रीमिंग कोणत्या ॲपवर उपलब्ध असेल?
टीम इंडिया विरुद्ध युएई सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य उपकरणांवरूनही या सामन्याचा आनंद घेता येईल.