काटोलच्या एसडीओंच्या सरकारी स्कॉर्पिओची ई-रिक्षा, बीएमडब्ल्यूला धडक

- दोघे जखमी; बीएमडब्ल्यूचे मोठे नुकसान : सरकारी वाहनाच्या काळ्या फिल्मवरून वाद

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
rickshaw and bmw accident काटोलच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्या सरकारी स्कॉर्पिओने ई-रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ई-रिक्षातील दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बीएमडब्ल्यूच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

rickshaw and bmw accident 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एसडीओ पीयूष चिवंडे हे नरखेड येथील शासकीय काम आटोपून सुनावणीसाठी तहसील कार्यालयात थांबले होते. दरम्यान, कार्यालयातील कर्मचारी मनीष चारडे हे शासकीय कामाची कागदपत्रे आणण्यासाठी जुनी सरकारी स्कॉर्पिओ (एमएच-३१-एफयू-९३८०) घेऊन नागपूरच्या दिशेने निघाले होते. रुग्णालयाजवळील पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर बाहेर पडताना स्कॉर्पिओची नागपूरहून काटोलकडे जाणाऱ्या ई-रिक्षाला धडक बसली. त्यानंतर स्कॉर्पिओची मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारशी (सीजी-०७-सीटी-९३४३) टक्कर झाली. या धडकेत बीएमडब्ल्यूच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. ई-रिक्षातील दोघांना दुखापत झाली असून, बीएमडब्ल्यूमधील प्रवासी सुखरूप बचावले.rickshaw and bmw accident धडकेदरम्यान सरकारी स्कॉर्पिओची एअरबॅग उघडल्याने चालक मनीष चारडे यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सरकारी वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावण्यात आल्याबद्दल बीएमडब्ल्यूमधील प्रवाशांनी आक्षेप घेतला. त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला.