रॅपिडो विरोधात रिक्षा चालकांकडून पुन्हा संपाची हाक

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
maharashtra-rickshaw-strike-december-1रॅपिडो, ओला, उबर विरोधात रिक्षा चालकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे दरवाढीसहीत रॅपिडोवर बंदी घालण्याची मागणी रिक्षा चालकांकडून केली जात आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांनी पुन्हा 1 डिसेंबर रोजी संपाची हाक दिली आहे. रिक्षा चालकांच्या मागणीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिली प्रतिक्रियाा दिली आहे. रिक्षा चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
 

rapido 
मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सरनाईक म्हणले, ‘रिक्षाचालकांच्या संपाच्या संदर्भात काही प्रतिनिधी मला भेटण्यासाठी येणार आहेत.एक डिसेंबरपासून होणारा प्रस्तावित संप होणार नाही, असा मला विश्वास आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री म्हणून माझी भूमिका सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांना देण्यात येणार आहेत. रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चेच्या माध्यमातून योग्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल’.
राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीवर सरनाईक यांनी भाष्य केलं. सरनाईक म्हणाले, आगामी काळात राज्यात मोठे पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या या महिन्यापुरता आणि पुढील महिन्यापर्यंत पाणीसाठा उपलब्ध असला, तरी आतापासूनच पाण्याचे नियोजन आणि काटकसर करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक महानगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद यांनी पाणी बचतीच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. राज्यात सर्वात कमी पाणीसाठा धाराशिव जिल्ह्यात असून, उपलब्ध माहितीनुसार तेथील पाणीसाठा केवळ ५.३४ टक्के आहे. पुढील आठ ते नऊ महिने अत्यंत काटकसरीने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यंदा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.