अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-students-fight-viral-videoशहरातील तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलंकार टॉकीजजवळ ही घटना घडल्याचे सांगितले जात असून, काही विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या घटनेतील सर्व विद्यार्थिनी एका खासगी शिकवणी वर्गात जात असल्याची माहिती आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची शहरात चर्चा सुरू झाली आहे. संबंधित तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत कसे झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, या प्रकरणाची तक्रार बजाजनगर पोलिसांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. व्हायरल व्हिडीओच्या आधारे घटनेची सत्यता पडताळून संबंधित तरुणींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.