घराच्या उत्तर दिशेला ठेवा या ५ वस्तू; वास्तुशास्त्रानुसार घरात येईल सुख-समृद्धी!

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
vastu shastra हिंदू धर्मात कुबेर देवाला धन आणि वैभवाची देवता मानले जाते. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार घराची उत्तर दिशा ही कुबेर देवाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेची रचना आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. घरात आर्थिक सुबत्ता, आनंद आणि सकारात्मक वातावरण टिकून राहावे, यासाठी उत्तर दिशेला काही विशिष्ट वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला ठेवता येणाऱ्या पाच वस्तू कोणत्या, जाणून घेऊया.

vastu shastra 
 
 
घराच्या उत्तर दिशेला कुबेर देवाची प्रतिमा किंवा छायाचित्र ठेवणे शुभ मानले जाते. त्यासोबत कुबेर यंत्राचीही स्थापना करता येते. यामुळे घरात धन-समृद्धी नांदते, अशी धार्मिक मान्यता आहे. या वस्तू ठेवताना परिसर स्वच्छ ठेवणे आणि श्रद्धेने पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. याचबरोबर या दिशेला मनी प्लांट, बांबू किंवा तुळशीसारखी हिरवीगार रोपे ठेवण्याचाही सल्ला दिला जातो. हिरवळ घरातील सकारात्मक वातावरणाचे प्रतीक मानली जाते. मात्र, रोपांची नियमित काळजी घेणे आवश्यक असून सुकलेली किंवा कोमेजलेली झाडे तिथून हटवावीत.
उत्तर दिशेला लहान वॉटर फाउंटन किंवा मत्स्यालय ठेवणेही वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते. याशिवाय धातू किंवा स्फटिकापासून तयार केलेले कासव ठेवण्याचीही परंपरा आहे. वाहते पाणी प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घराच्या या दिशेला नदी, धबधबा किंवा वाहत्या पाण्याचे चित्र लावण्याचाही पर्याय आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक नामफलक आणि विंड चाइम लावता येते.vastu shastra पाचवी वस्तू म्हणजे तांब्याचा किंवा पितळेचा कलश. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून तो उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. कलशातील पाणी वेळोवेळी बदलणे आणि तो स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. या पाच वस्तूंच्या माध्यमातून घरात सुख-शांती आणि आर्थिक सुबत्ता नांदते, अशी वास्तुशास्त्रातील मान्यता आहे.