त्रिपुरारी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय? जाणून घ्या

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
tripurari-purnima2026हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा, मंदिरांमध्ये दीपोत्सव आणि दीपदान केले जाते. तसेच कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठीही भाविकांची गर्दी होते. कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता, त्रिपुरारी पौर्णिमेमागील पौराणिक कथा काय आहे आणि या दिवशी दीपदान करण्याची परंपरा का आहे?
 

tripura pornima 
माहितीनुसार, कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी 24 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 23 मिनिटांपर्यंतचा काळ महत्त्वाचा आहे. कार्तिक स्वामींच्या पूजेमध्ये 27 रुद्राक्षांची माळ आणि पांढरी फुले अर्पण केली जातात. काही ठिकाणी देशी गुलाबाची फुलेही वाहिली जातात. दूध, दही आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपराही आहे. यापैकी उपलब्ध असलेल्या वस्तू श्रद्धेने अर्पण कराव्यात. या दिवशी कार्तिक स्वामींच्या 28 नावांचा उल्लेख असलेल्या प्रज्ञाविवर्धन कार्तिकेय स्तोत्राचे पठण करता येते. धार्मिक परंपरेनुसार, या दिवशी मद्यपान आणि मांसाहार टाळावा.
एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी भगवान शिवांनी अनादी आणि अनंत अशा दिव्य ज्योतीच्या स्तंभाचे स्वरूप प्रकट केले. या ज्योतीचा आरंभ आणि अंत शोधण्यासाठी ब्रह्मदेव वरच्या दिशेने, तर भगवान विष्णू खालच्या दिशेने गेले. बराच शोध घेऊनही विष्णूंना ज्योतीचा अंत सापडला नाही. त्यांनी परत येऊन सत्य सांगितले. मात्र, ब्रह्मदेवांनी ज्योतीचा आरंभ पाहिल्याचे सांगत असत्याचा आधार घेतला.