या तीन गोष्टींनी करा मुलांच्या रागांवर कंट्रोल

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
childrens anger राग (Anger) ही भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. पण अनेकांना राग इतका वाढतो की यामुळे नात्यावर चुकीचा परिणाम होतो. राग शांत करण्यात बराच वेळ जातो. (Easy Way To Handle Kids Anger) रागाने उलट बोलल्यानंतर अनेकांना समजतं की आपली हट्ट करण्याची पद्धत चुकीची होती. रागवणाऱ्या मुलांना वेळीच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवलं तर पुढे जास्त त्रास होत नाही. (How to Control Your Anger With Kids) अशावेळी पालकांची जबाबदारी असते की मुलांच्या रागावर त्यांना नियंत्रण ठेवता यायला हवं.

childrens anger 
 
मुलांच्या रागाववर नियंत्रण मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स
मुलांचा राग कसा हॅण्डल करावा...?
१) मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू नका...
आई वडील मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्ही अशी चूक करू नका. मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या तर त्यांना सवय लागते आणि इच्छा पूर्ण न झाल्यास ते राग राग करतात. म्हणून त्यांना सुरूवातीपासूनच आवश्यक असतील त्याच गोष्टी घेऊन द्या.
२) मुलांना रागात काहीही बोलू नका...
रागात तुम्ही मुलांना काहीही बोलाल तर ते तेच लक्षात ठेवतील. मुलांचा राग शांत करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्यांच्याशी प्रेमाने बोला. मुलांना शांततेने बोलायला शिकवा. जर तुम्ही त्यांच्यावर रागावलात तर ते स्वत:ही तशीच प्रतिक्रिया देतील. त्यांचे एग्रेशन लेव्हल जास्त वाढू शकते.
३) एग्रेसिव्ह मुलांना एकटे सोडू नका...
जर तुमचे मुल लहान असेल आणि कोणतीही जिद्द करत असेल तर त्याला शांत करण्यासाठी तुम्ही प्रेमाने स्पर्श करू शकता. मिठी मारणं, मुलांचा हात हातात घेणं, त्यांना प्रेमाने समजावणं. पण जर मुलं मोठी झाली असतील तर राग कंट्रोल करण्यासाठी त्यांना वेळ दया आणि शांत होण्यासाठी वेळ द्या.