भरधाव कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर चौघांची प्रकृती चिंताजनक

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
पिंपरी-चिंचवड
Pimpri-Chinchwad Accident
शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात मध्यरात्री भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले. वाल्हेकरवाडी येथील हॉटेल हॅपी ब्रँचसमोरील रस्त्यावर ही दुर्घटना घडली.



मिळालेल्या माहितीनुसार, कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.

या अपघातात बालाजी दीपक गायकवाड (वय २६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.