वर्धा,
wardha-news प्राथमिक शाळांतील विद्याथ्र्यांचे दैनंदिन अध्यापन प्रभावित करणार्या ऑनलाईन कामांच्या अतिरेकामुळे मुख्याध्यापक-शिक्षक त्रस्त आहेत. संचमान्यता धोरणाचे दुष्परिणाम, टीईटी संबंधाने शासनाची नकारार्थी भूमिका यासह राज्यातील प्राथमिक शाळांचे अस्तित्व संपवणारे धोरण, शाळांच्या अडचणी यासह शिक्षकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याची भूमिका मंगळवार २४ रोजी शिक्षक भवन, पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आली. प्रशासनिक व्हॉट्सॲप ग्रुपवरून बाहेर पडू तसेच ऑनलाईन कामातही असहकार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.
या बैठकीत विविध शिक्षक संघटनांचे नेते संभाजी थोरात, उदय शिंदे, केशव जाधव, कल्याण लवांडे, मधुकर कठोळे, सुनील तेलतुंबडे, नवनाथ गेंड, साजिद निसार अहमद, मनोज मराठे, गोविंद उगले, पुरुषोत्तम जाधव, प्रभाकर पारवे, मिलिंद खंडिझोड, संजय कुर्डुकर, आनंदा कांदळकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ऑनलाईन कामांच्या अतिरेकामुळे आणि विविध उपक्रम लादण्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षक शिक्षकांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक अध्यापन कार्य करीत आहे. मात्र, अपुर्या वेळेमुळे विद्याथ्र्यांना पाहिजे तितका न्याय देता येत नाही. अशैक्षणिक कामे न करण्याचा शासनाने निर्णय निर्गत करूनही अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामे थोपवली जात आहे. शाळांमध्ये एनजीओचा वाढलेला हस्तक्षेप त्रासदायक ठरत आहे. या पृष्ठभूमीवर सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन लढा उभारणे आवश्यक आहे. कथित प्रशासनिक व्हॉट्सअप ग्रुपवरील वेळी-अवेळी येणारे संदेश, आदेश आणि ऑनलाईन कामाच्या ससेमिर्यामुळे शिक्षक प्रचंड हैराण झाले आहे. दैनंदिन अध्यापन कार्य प्रभावित करणारे व शिक्षकांची मनस्थिती खराब करणारी ऑनलाईन कामे १ डिसेंबर पासून कोणत्याही शिक्षकाने करू नये तसेच तथाकथित सर्व प्रशासनिक व्हॉट्सअप ग्रुपवरून शिक्षकांनी बाहेर पडावे अशाप्रकारे असहकार पुकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी यावेळी दिली आहे.