त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांनी उजळली पवनीची वैनगंगा

दीपमाळांच्या नयनरम्य दृश्याने फेडले डोळ्यांचे पारणे

    दिनांक :25-Nov-2026
Total Views |
पवनी,
tripurari-purnima त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर ऐतिहासिक पवनी नगरीतील वैनगंगा नदीचे पात्र हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशाने उजळून निघाले. रात्रीच्या निरव शांततेत वैनगंगेच्या संथ प्रवाहावर तरंगणाऱ्या या दीपमाळांचे विलोभनीय दृश्य पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
 
tripurari-purnima
 
पवनी येथील वैनगंगा तीरावर त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त दीपदान करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. यंदाही या परंपरेला उजाळा देत संध्याकाळपासूनच नदीच्या घाटावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आबालवृद्धांसह महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विधिवत पूजाअर्चा करत वैनगंगेच्या पात्रात दीपदान केले. संथ वाटाव्या अशा अत्यंत मंदगतीने वाहणाऱ्या निळयाशार पाण्यावर जणू आकाशातील चांदण्याच अवतरल्या आहेत, असा भास निर्माण करणारा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. नदीच्या पायऱ्यांवर बसून हा नयनरम्य दीपोत्सव डोळ्यांत साठवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने संपूर्ण घाट परिसर उजळून निघाला होता. दिव्यांच्या माळा लावल्यागत वैनगंगेचे पात्र सजले हाेते. एकीकडे दिव्यांचा मदत प्रकाश अन्अ दूसरीकडे फटाक्यांची आतिषबाजी असे आनंदाचे उधळण करणारे चित्र वैनगंगेच्या काठी पाैर्णिमेच्या चांदण्यात पडले हाेते.
 
 
पवनी येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेने पवनीच्या वैभवात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला असून, या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. वैनगंगेचे हे लाेभस रुप पाहण्यासाठी परगावातीलही अनेकांनी गर्दी केली हाेती, हे विशेष!