मेडिकलच्या डॉ. चंदा वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

- नियुक्तीसाठी बनावट कागदपत्रे

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
chanda wankhede शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षक (ट्यूटर) पदावर नियुक्ती मिळविण्यासाठी कथितरीत्या बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. चंदा हिरामनजी वानखेडे यांच्याविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

chanda wankhede 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. चंदा वानखेडे यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर पदावर नियुक्ती मिळविण्यासाठी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार करण्यात आली होती. या कागदपत्रांच्या आधारे शासकीय संस्थेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.chanda wankhede या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले किरण अंकुशराव फड (२७, रा. बनपिंपळा, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी संबंधित कलमांनुसार डॉ. चंदा वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.