अनिल कांबळे
नागपूर,
raped by instagram friend इन्स्टाग्रामवर झालेली ओळख, त्यानंतर सुरू झालेले फोनवरील संभाषण आणि पुढे घडलेला धक्कादायक प्रकार... कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाली. पोट दुखत असल्यामुळे डॉक्टरांकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय तरुण महफूज आलम या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नवव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. त्या मुलीची आरोपी महफूजसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. आरोपी पीडितेच्या आत्याच्या घराजवळ राहत असल्याने दोघांमध्ये फोनवरून बोलणे सुरू होते. २५ नोव्हेंबर रोजी महफूजने मुलीला घराच्या मागील बाजूस बोलावले. तेथे तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारातून ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिने आईकडे तक्रार केली. त्यामुळे दोघेही मायलेकी डॉक्टरांकडे गेल्या.raped by instagram friend तपासणीत मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या आईला धक्का बसला. तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. मात्र, डॉक्टरांनी गर्भवती असल्याचे सांगून पोलिसांकडे पाठवले. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(२) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवकाला अटक केली आहे. तो युवक उत्तरप्रदेशचा असून कामाच्या शोधात नागपुरात आला होता. पुढील तपास कपिलनगर पोलिस करीत आहेत.