शेतकरी पुत्र आदेश ढगेची आभाळी झेप

२३ व्या वर्षी चित्रपट ओटीटीवर

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
वर्धा,
aadesh dhage वर्धेतील स्वतंत्र आणि युवा चित्रपट दिग्दर्शक आदेश ढगे यांच्या व्हॉइस ऑफ ओल्ड हा लघुपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर झीवर प्रदर्शित झाला. वर्धा जिल्ह्यातून या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला. आदेश यांचे शालेय शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, वर्धा येथे झाले. यशवंत महाविद्यालयातून कला शाखेची पदवी पूर्ण केली. पाच काळात त्यांनी स्वतःहून चित्रपट निर्मिती शिकण्यास सुरुवात केली आणि लेखन, दिग्दर्शन व संकलन या क्षेत्रांत स्वतःला घडवले.
 
aadesh dhage
 
 
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या प्रवासात या चित्रपटाला ३५ हून अधिक नामांकने मिळाली असून विविध श्रेणीमध्ये १० हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच १५ हून अधिक देशांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आदेश यांनी अनेक जबाबदार्या स्वतः सांभाळल्या विशेष म्हणजे, चित्रपटाचे संकलनही त्यांनी स्वतःच्या लॅपटॉपवर केले. या चित्रपटात वर्धा जिल्ह्यातील बाभूळगाव (बाबापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा ११ वर्षीय सार्थक मासणे मुख्य भूमिकेत आहे. अभिनयाचा कोणताही पूर्वानुभव नसतानाही सार्थकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकली. त्याला भारत आणि अमेरिकेत प्रत्येकी एक असे दोन सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे पुरस्कार मिळाले.
’द व्हॉइस ऑफ ओल्ड’ हा चित्रपट आदिवासी संस्कृती, लुप्त होत चाललेल्या बोलीभाषा आणि पारंपरिक लोकगीतांच्या संवर्धनाचा विषय मांडतो. चित्रपटाची कथा एका आदिवासी मुलाभोवती फिरते.aadesh dhage शाळेत तो इंग्रजी कविता शिकतो तर दुसरीकडे त्याची आजी त्याला पिढ्यानपिढ्या चालत आलेले पारंपरिक लोकगीत शिकवते. आधुनिक शिक्षण आणि सांस्कृतिक ओळख यांच्यातील बदलते नाते तसेच काळाच्या ओघात हरवत चाललेल्या परंपरा जपण्याचे महत्त्व या चित्रपटातून अधोरेखित केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वर्धा जिल्ह्यातील दहेगाव (गोसावी), बाभूळगाव, सुकळीबाई, शिरसमुद्रपूर, पवनार आणि गोजी येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण जीवन, परिसर आणि सांस्कृतिक वातावरण पडद्यावर साकारण्यात आले आहे. या प्रकल्पात झोहेब बशीर आणि आदित्य दरने यांनी सहनिर्मिती म्हणून योगदान दिले आहे. तसेच अजय तिगावकर यांनी डबिंगसाठी सहकार्य केले.
या चित्रपटाच्या प्रवासात सतीश खेलकर, मयूर मासणे, आदित्य दरने, झोहेब बशीर, वैभव होते, शकेब शेख, अजय तिगावकर, राजू मडावी, कावडूजी कावडूजी उईके, संजय कमानापुरे, सविता सविता घोडे, प्रतीक्षा शेंद्रे, समीक्षा शेंद्रे, किशोर राऊत दर्शन खडसे, विक्की मसराम आणि आदित्य भालेराव यांचे मोलाचे योगदान लाभले. वध्र्यातील ग्रामीण भागात अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झाला आहे. ’द व्हॉइस ऑफ ओल्ड’ हा ग्रामीण वध्र्यातील कथा, संस्कृती आणि प्रतिभेला व्यापक व्यासपीठ मिळवून देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.