वर्धा,
illegal-moneylender-reined-in जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने रामनगर पोलिस ठाण्याच्या शेजारी राहणार्या वामन व राकेश वंजारी यांच्या निवास्थानी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत अधिकार्यांनी अवैध सावकारीबाबतचे १४० प्रकारचे कागदपत्र जप्त केले. ही कारवाई प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबुंधक गौतम वालदे यांनी केली. ही कारवाई आज गुरुवार २६ रोजी करण्यात आली.
रामनगर पोलिस स्टेशनच्या शेजारी राहणारे वामन व त्यांचा मुलगा राकेश वंजारी हे अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाली. याच तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने आज सकाळी वंजारी यांच्या घरी छापा टाकून कागदपत्रांची बारकाईने पाहणी केली. अधिकार्यांना वंजारी यांच्या घरातून काही जमिनीचे सातबारा, विक्रीपत्र, धनादेश असे एकूण १४० प्रकारचे कागदपत्रे मिळून आले. ही कागदपत्रे अधिका-यांनी जप्त केली आहे. शिवाय या प्रकरणाची अधिकची चौकशी सध्या केली जात असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी सांगितले.
सावकारी करीत असल्यास करा तक्रार
वंजारी यांच्याबाबत अधिकची माहिती किंवा इतर कुणी अवैध सावकारी करीत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास द्यावी. तक्रारकत्र्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. शिवाय अवैध सावकारी करणार्यावर धडक करवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी केले आहे.