बँकॉक,
massive fire bangkok थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एका तेल डेपोला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. बँगचक तेल डेपोमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटानंतर आग भडकली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळावरून आगीच्या उंच ज्वाळा उसळताना पाहिल्या. काही वेळातच आकाशात काळ्या धुराचे दाट लोट पसरले.
बँकॉकमधील बँगना जिल्हा कार्यालयाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर निवेदन प्रसिद्ध करून तेल डेपोमध्ये स्फोट झाल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. पूर्व बँकॉकमध्ये असलेला हा तेल डेपो थायलंडमधील ऊर्जा क्षेत्रातील कंपनी बँगचक कॉर्पोरेशनद्वारे चालवला जातो.
घटनेनंतर परिसरात आपत्कालीन वाहनांचे सायरन घुमू लागले. अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा उंच उसळत असल्याने आणि काळ्या धुराचे लोट दूरवर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.massive fire bangkok दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त तातडीने समोर आले नव्हते. घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते.