संभाव्य पाणीटंचाई:ग्रामीण भागातील विहिरींचे अधिग्रहण

बार्शीटाकळी तालुक्यात २४ विंधन विहिरींना मंजुरी: सहा नळ योजनेची होणार दुरुस्ती

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
अकोला,
acquisition of wells शहरी भागासोबतच ग्रामीण भागालाही पाणीटंचाईच्या चटके आतापासून सोसावे लागत असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पातुर तालुक्यातील दोन तर मुर्तीजापुर तालुक्यातील चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले तर बार्शीटाकळी तालुक्यात २४ विंधन विहिरींना मंजुरी तर सहा नळ योजनेची विशेष दुरुस्ती करण्याला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली असून दोन नळ योजनेचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.
 

acquisition of wells 
 
 
यंदा एल निनोच्या प्रभावाने पाऊस समाधानकारक झाला नाही, परिणामी खरीप पिकांचे हानी झाली व रब्बी पिकावर देखील आता संकट आहे. शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा या बसू शकतात त्या दृष्टीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण ७३९ गावांमध्ये २ हजार २१९ विविध उपाययोजना राबवण्याचे याआधी कधी नव्हे एवढे मोठे नियोजन यंदा करण्यात आले आहे.acquisition of wells त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्वेक्षण केले. त्यानुसार उपाययोजना राबविण्यास ग्रामीण भागात सुरुवात करण्यात आली आहे.
१२६ कोटींचा कृती आराखडा
जिल्ह्यात ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२५ कोटी ८४ लाख ४ हजार रुपयांचा एकूण खर्च असणारा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला असून, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण विभागाने संयुक्त आराखडा मान्यतेसाठी शासनाला सादर केला आला आहे.
खांबोरा नळ योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर
खांबोरा व गोपालखेड नळ योजनेचा विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून एकूण आठ नळ योजनेची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना असणाऱ्या मर्यादेपेक्षा या दोन योजनांचा खर्च जास्त असल्याने तो मंजुरी करता शासनाला सादर करण्यात आला आहे.