१३ वर्षीय मुलाच्या मेंदूतील गाठ नाकाद्वारे काढली

कवटी न उघडता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रिया

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
वर्धा,
adani institute येथील अदाणी इ्स्टिटट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च अंतर्गत येणाऱ्या सावंगी (मेघे) स्थित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. डॉक्टरांनी एका १३ वर्षीय मुलाच्या मेंदूत पुन्हा वाढलेली मोठी आणि गुंतागुंतीची गाठ (पिट्यूटरी ट्यूमर) नाकाच्या नैसर्गिक मार्गाने दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या काढली. या शस्त्रक्रियेमुळे मुलाची कवटी पुन्हा उघडण्याची गरज टळली असून, डोळ्यांच्या नस आणि मेंदूच्या संवेदनशील भागांवरील दाब कमी करण्यात यश आले आहे.
 
 
adani institute
 
 
कान-नाक-घसा व कवटीच्या तळाशी संबंधित शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. चंद्रवीर सिंग, मेंदूविकार शल्यचिकित्सक डॉ. संदीप इरातवार आणि कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. श्रद्धा जैन यांच्या संयुक्त चमूने ही शस्त्रक्रिया केली. ‘एंडोस्कोपिक एंडोनासल ट्रान्सस्फेनॉइडल’ या अत्याधुनिक पद्धतीने नाकातून मेंदूच्या तळाशी पोहोचून ही गाठ काढण्यात आली. सदर मुलावर यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये कवटी उघडून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गाठीची पुन्हा वाढ झाली होती. मेंदूतील पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यासाठी ऑगस्ट २०२६ मध्ये त्याच्यावर व्हीपी शंटची प्रक्रियाही करण्यात आली होती.
गेल्या तीन वर्षांपासून मुलाला सतत डोकेदुखी आणि दृष्टी कमी होण्याचा त्रास होत होता. तपासणीत गाठ मेंदूच्या तळाशी पसरली असून, दृष्टीच्या मुख्य नसा, मेंदूतील तिसरे व्हेंट्रिकल, मिडब्रेन आणि पॉन्स या संवेदनशील भागांवर दबाव टाकत असल्याचे आढळले. मुलाचे कमी वय आणि यापूर्वी झालेली मोठी शस्त्रक्रिया लक्षात घेता पुन्हा कवटी उघडून शस्त्रक्रिया करणे धोकादायक होते. त्यामुळे डॉक्टरांनी नाकाच्या मार्गाने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मेंदूतील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या, ब्रेनस्टेम आणि डोळ्यांच्या नसांना कोणतीही इजा न पोहोचवता गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती स्थिर असून, त्याच्या दृष्टीतही सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे. पुढील काळात नेत्ररोग आणि मेंदूविकार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू राहणार आहेत.adani institute डॉक्टरांच्या मते, पिट्यूटरी प्रोलॅक्टिनोमावर सामान्यतः सुरुवातीला औषधोपचार केले जातात. मात्र, औषधांना प्रतिसाद न मिळाल्यास किंवा दृष्टीच्या नसांसह मेंदूच्या महत्त्वाच्या भागांवर दबाव निर्माण झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.