हैदराबाद,
grand canyon of india अमेरिकेतील ग्रँड कॅनियन हे जगातील प्रसिद्ध नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. मात्र, असाच एक अद्भुत निसर्गाविष्कार भारतातही पाहायला मिळतो. आंध्र प्रदेशातील वायएसआर कडप्पा जिल्ह्यात असलेल्या गंडीकोटाला 'भारताचा ग्रँड कॅनियन' म्हणून ओळखले जाते. पेन्नार नदीने हजारो वर्षांच्या कालावधीत खडकाळ पर्वतरांगांमधून आपला मार्ग तयार केला आहे. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे येथे खोल दरी, उंच कडे आणि लालसर खडकांची भव्य रचना निर्माण झाली आहे. एका बाजूला उंचच उंच खडक आणि दुसऱ्या बाजूला नागमोडी वळणे घेत वाहणारी पेन्नार नदी, असे येथील दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. विशेष म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी खडकांवर पडणाऱ्या सोनेरी प्रकाशामुळे या परिसराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.

गंडीकोटा केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नव्हे, तर ऐतिहासिक वारशासाठीही प्रसिद्ध आहे. येथे असलेला गंडीकोटा किल्ला या परिसराचे प्रमुख आकर्षण आहे. मध्ययुगीन काळात या किल्ल्याला सामरिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान होते. पेम्मासानी नायकांच्या राजवटीत या किल्ल्याचा विकास झाला. भक्कम तटबंदी, बुरूज, प्राचीन मंदिरे, मशिदी, धान्यकोठार आणि इतर ऐतिहासिक वास्तू आजही या परिसराच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. किल्ल्याच्या परिसरात रघुनाथस्वामी मंदिर, माधवराय मंदिर आणि जामा मशीद या वास्तू विशेष पाहण्यासारख्या आहेत. प्राचीन स्थापत्यकला, दगडी बांधकाम आणि ऐतिहासिक अवशेष यामुळे इतिहासप्रेमींसाठीही हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरते.
गंडीकोटाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी तुलनेने उत्तम मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असल्याने पर्यटकांना परिसर फिरणे आणि निसर्गाचा आनंद घेणे सोयीचे होते. येथे कॅनियन व्ह्यू पॉइंट, किल्ल्याची तटबंदी आणि पेन्नार नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य अनुभवता येते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण विशेष पर्वणी आहे. जवळच्या परिसरात साहसी पर्यटनाच्या काही सुविधाही उपलब्ध आहेत. कडप्पा आणि जमालमडुगू परिसरातून रस्त्याने गंडीकोटा पोहोचता येते. मात्र, भेट देण्यापूर्वी स्थानिक वाहतूक, निवास आणि साहसी उपक्रमांची उपलब्धता तपासणे आवश्यक आहे. निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा अनोखा संगम असलेले गांडीकोटा हे