जंगलात प्रियकराला मारहाण करून तरुणीवर बलात्कार

- व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

    दिनांक :26-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
woman raped सोनगाव तलावाजवळील निर्जन अमराई जंगलात एकांतात बसलेल्या प्रियकर-प्रेयसीजवळ एक युवक पोहचला. त्याने प्रियकराला मारहाण केली आणि तरुणीला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्यानंतर आरोपी युवकाने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान तिचा अश्लील ‌व्हिडिओ काढला. आरडाओरड केल्यास जीवे मारण्यासह अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीची शोधाशोध केली मात्र, घटनेला ४८ तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. सोनगाव पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढत आहेत.

जंगलात प्रियकराला मारहाण करून तरुणीवर बलात्कार 
 
 
सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सोनेगाव तलावाजवळील जंगलातील निर्जन ठिकाणी तरुणी तिच्या प्रियकरासोबत अंधारात गप्पा करीत बसली होती. यादरम्यान आरोपी युवकाने त्यांना गाठले. त्याने तरुणीच्या प्रियकराला मारहाण करून तेथून पळवून लावले आणि तरुणीशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घटनेनंतर जवळपास २४ तासांनी, मंगळवारी तरुणीने कुटुंबीयांसह सोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.woman raped पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडीओ काढला. तिच्या मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. तक्रारीनंतर सोनगाव पोलिस आणि गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला. जंगलाच्या प्रवेश मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आरोपीच्या हालचाली आणि कोणत्या दिशेने पळून गेला, याबाबत माहिती काढत आहेत.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे सोनेगाव तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात संशयास्पद व्यक्तींचा वावर असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही चिंता व्यक्त केली होती. अंधाऱ्या आणि निर्जन भागांत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरात, विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी, नियमित पोलिस गस्त आणि प्रभावी देखरेख वाढविण्याची मागणी होत आहे.