वाशीम,
child marriage बालविवाह पूर्णपणे थांबविण्यासाठी सार्वत्रिक जनजागृती गरजेची असून, त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले. बालविवाह, अल्पवयीन विवाह आणि सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभागाच्या वतीने आज, २७ नोव्हेंबर रोजी शहरात बालविवाहमुक्त जनजागृती रॅली काढण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, जिपोअ निकेश खाटमोडे व आदी उपस्थित होते. बालविवाह ही सामाजिक समस्या असून, तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. बालविवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य धोक्यात येते. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती आणि सामाजिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. रॅलीदरम्यान उपस्थितांना बालविवाहमुक्तीची शपथ देण्यात आली.child marriage या जनजागृती रॅलीमध्ये शहरातील नर्सिंग महाविद्यालयांसह विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून बालविवाह निर्मूलनाचा संदेश शहरात पोहोचविण्यात आला.