रोटरी क्लब नागपूर डाउनटाउनचा सामाजिक उपक्रम

२८ नोव्हेंबरला लोकार्पण

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
नागपूर
rotary-club-of-nagpur थेलेसिमिया आणि सिकलसेल या आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब नागपूर डाउनटाउनच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत लोक कल्याण समिती रक्तपेढीला जनजागृती व्हॅन प्रदान करण्यात येणार आहे.
 
rotary-club-of-nagpur
 
या व्हॅनच्या माध्यमातून थेलेसिमिया व सिकलसेल आजारांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता जोग सेंटर, हॉटेल प्राइडच्या मागे, कन्नमवार नगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रोटरी क्लब नागपूर डाउनटाउन आणि लोक कल्याण डायग्नोस्टिकचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.