जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा; जलसंधारण कामांना प्राधान्य

टंचाईशी संबंधित कामे १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
वाशीम,
conservation works पेयजलाची उपलब्धता हे शासनाचे प्राधान्य असून, त्यादृष्टीने नियोजन व्हावे. जिल्ह्यात सर्वत्र जलसंधारण कामे व्यापकपणे राबवावीत. टंचाईशी संबंधित कामे गुणवत्तापूर्ण व १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक, तसेच दुष्काळ निवारण सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार संजय देशमुख, आमदार श्याम खोडे, आमदार भावना गवळी, आमदार सईताई डहाके, आमदार अमित झनक, आमदार किरण सरनाईक, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिपोअ निकेश खाटमोडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला आदी उपस्थित होते.
 
 
 
conservation works
 
 
पालकमंत्री भरणे म्हणाले की, हे दुष्काळाचे वर्ष असल्याने पेयजलाचे स्त्रोत वाचवणे व सर्वत्र पाण्याची उपलब्धता ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे परिपूर्ण नियोजन करावे. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कामांना गती द्यावी. व्हीबी जी राम जी योजनेतून भरीव रोजगारनिर्मिती व्हावी. सार्वजनिक कामांवर भर द्यावा. शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्धता. विविध योजनांतून आवश्यक मदत वेळेत करावी. पीक विमा कंपनीबाबत तक्रारी आहेत. त्यांचे निराकरण करून शेतकरी बांधवांना भरपाई द्यावी. जलाशयांतून अनधिकृत उपसा रोखण्यासाठी पथकांनी सजगता बाळगावी. अवैध उपसा सिंचनाबाबत जारी आदेशांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
शहराची व गावाची गरज लक्षात घेऊन विहीर अधिग्रहण करावे. विहीर अधिग्रहणाचा यापूर्वी प्रलंबित निधी असल्यास तो अदा करण्याची कार्यवाही व्हावी. जलसंधारणाचे कृती आराखडे शासन स्तरावर पाठवावेत. पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणीवाटपाबाबत लोकप्रतिनिधींची सूचना लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी तत्काळ जलसंपदा मंत्र्यांसमवेत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली व याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली. या संदर्भात शासन स्तरावर लवकरच बैठक होणार आहे.
वाशीम आकांक्षित जिल्हा आहे.conservation works अधिकाधिक जलसंधारण कामे राबविण्यासाठी शासन स्तरावर, तसेच नीती आयोगाकडेही प्रस्ताव द्यावेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातूनही कामांना चालना द्यावी. जिल्ह्यातील पशुधनाची आवश्यकता लक्षात घेऊन चारासाठा उपलब्धता ठेवावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. सर्वसाधारण योजनेत ३४१ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत ७६ कोटी व आदिवासी उपयोजनेत १५ कोटी ८ लाख रुपये मंजूर नियतव्यय आहे. सर्वसाधारण योजनेत १९० कोटी ६४ लाख रूपये, अनुसूचित जाती उपयोजनेत २२ कोटी १८ लाख रूपये व आदिवासी उपयोजनेत ७ कोटी ५१ लाख रूपये आदी प्रशासकीय मान्यता झाल्या असून, इतरही मान्यतांची कार्यवाही सुरू आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्ह्यातील नगरपरिषद अध्यक्ष, समिती सदस्यांनी मांडलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपलब्ध पाणीस्त्रोत, प्रत्यक्ष पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, अपूर्ण योजना, सुरू असलेली कामे आवश्यक अतिरिक्त निधी, नवीन कामे आदींचा आढावा घेण्यात आला. सुरुवातीला संविधानदिनानिमित्त सभागृहात शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीला यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती होती.