जिल्हा मध्यवर्ती बँक होणार आर्थिक सक्षम

प्रशासक स्विकारणार पदभार

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
वर्धा,
district-central-bank वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमतेसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्य सहकारी बँकेचे प्रशासक ५ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा सहकारी बँकेचा पदभार स्विकारणार आहेत.
 
 
 
मुख्यमंत्री शी.देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी निवेदन देऊन वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वर्तमान सद्यस्थितीकडे लक्ष वेधले होते. सन २००२ पासून बँक आर्थिक अडचणीत आली होती. सन २०१४ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या प्रयत्नामुळे बँकेला सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली करण्यात आली होती. त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी २१ नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांना पत्र निर्गमित करून राज्य सहकारी बँकेचे प्रशासक ५ डिसेंबर रोजी पदभार स्विकारणार आहेत.