जिल्हा परिषद विविध नपा कडे जीवन प्राधिकरणाची कोट्यावधीची थकबाकी

जलसंकटात आर्थिक संकट

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
बुलढाणा,
economic-crisis-in-water-crisis जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट असतांना जिल्हा परिषद विविध नगर परिषदेकडे कोट्यावधीची थकीत असल्याने महाराष्ट्र जिवन प्राधिकरण बुलढाणा विभाग आर्थिक टंचाईत सापडले आहे. जिल्ह्यात १५१९६.८० लक्ष रुपयांची थकबाकी असून सर्वसाधारण मालमत्ता धारकाकडून नगर परिषद प्रशासन सक्तीची वसुली करूनही महाराष्ट्र जिवन प्राधिकरणकडे पाणी पट्टी पोटी आकारलेला कर वर्ग करीत नाही.
 
 
economic-crisis-in-water-crisis
 
जिल्हा परिषद व नगर परिषद नागरिकांडून दरवर्षी करापोटी पाणीपट्टी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोटीवधी रुपयांची वसुली करीत असतांना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांची कोट्यावधीची रुपयांची थकबाकी असल्याची माहिती संबधित विभागाने दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक थकबाकी खामगाव नगर परिषद ६७८९.४९ लक्ष रुपये त्या खालोखाल बुलढाणा नगर परिषद ३३८८.३३ लक्ष, जळगाव जामोद नगर परिषद २८८४.८९ लक्ष रुपये, शेगाव नगर परिषद २१२७.२८ लक्ष व १.६० लक्ष तसेच जिल्हा परिषद ५.२९ लक्ष रुपये असे एकूण १५१९६.८० लक्ष रुपये थकबाकी आहे. सध्या सर्वत्र पावसा अभावी जलसंकटाचा सामना सर्व सामान्य नागरिक शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. धरणाची जलपातळी दिवसेन दिवस घटत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला जिल्हा परिषद नगर परिषदाकडे असलेल्या थकबाकीने आर्थिक सकंटात सापडले आहे.