अमेरिकेतील प्रत्येक मिळणार SpaceX चे 2 शेअर्स

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
elon-musk-spacex-shares-childrenजगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांनी अमेरिकेतील मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, त्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. मस्क यांच्या योजनेनुसार अमेरिकेतील प्रत्येक मुलाला ज्यांची संख्या सुमारे 72 दशलक्ष इतकी आहे. SpaceX कंपनीचे शेअर्स दिले जातील. सुरुवातीला प्रत्येक मुलाला 2 शेअर्स मिळतील आणि पुढे दरवर्षी 1 अतिरिक्त शेअर दिला जाईल. या संपूर्ण योजनेचे मूल्य सुमारे 18.4 अब्ज डॉलर्स इतके मानले जात आहे. थँक्सगिव्हिंग सुट्टीच्या निमित्ताने मस्क यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. या उपक्रमासाठी SpaceX आणि स्वतः मस्क योगदान देणार आहेत.
 

spacex 
U.S. Census Bureau च्या अंदाजानुसार अमेरिकेत सुमारे 72 दशलक्ष मुले आहेत. या योजनेत प्रत्येक मुलाला सुरुवातीला 2 शेअर्स आणि त्यानंतर दरवर्षी आणखी 1 शेअर देण्याची तरतूद आहे. मस्क यांनी वैयक्तिकरित्याही काही शेअर्स देण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, लाभार्थी मुलांची ओळख कशी निश्चित केली जाईल आणि शेअर्स त्यांच्या नावावर कसे दिले जातील, याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
ग्विन शॉटवेल यांचे योगदान आणि मागील घोषणा
या उपक्रमात SpaceX च्या अध्यक्षा ग्विन शॉटवेल यादेखील सहभागी झाल्या असून, त्यांनी 2 दशलक्षाहून अधिक शेअर्स देण्याचे वचन दिले आहे. यापूर्वी SpaceX ने अमेरिकेतील प्रत्येक सक्रिय ट्रम्प अकाउंटला 1 Class A कॉमन शेअर देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुलांसाठी शेअर्स देण्याची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.
माहितीनुसार SpaceX च्या एका शेअरची किंमत 127.44 डॉलर्स इतकी आहे. या हिशोबाने मुलांना दिल्या जाणाऱ्या शेअर्सचे एकूण मूल्य सुमारे 18.4 अब्ज डॉलर्स होते, मात्र भविष्यात शेअरच्या किमतीत बदल होऊ शकतो. शेअर्सचे वाटप आणि विक्रीचे नियम अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरम्यान, Bloomberg Billionaires Index नुसार मस्क यांची एकूण संपत्ती सुमारे 820 अब्ज डॉलर्स आहे. यामध्ये SpaceX मधील त्यांच्या हिश्श्याचे मूल्य सुमारे 650 अब्ज डॉलर्स असून, उर्वरित संपत्ती Tesla, The Boring Company आणि Neuralink मधील गुंतवणुकीतून आहे.