प्रेयसीचे ठरले लग्न अन प्रियकराची आत्महत्येची धमकी

सिताबर्डीतील युवतीला गाठून त्रास दिल्याचा आरोप

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
threat suicide प्रेमसंबध संपवून नातेवाईक युवकासोबत विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवतीला प्रियकराने आत्महत्या करण्याची धमकी दिली. ही घटना सिताबर्डी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी सिताबर्डी पोलिसांनी राहुल दीपक चौरसिया (वय २४, रा. गोंदिया) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

threat suicide 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती आणि आरोपी राहुल चौरसिया हे एकमेकांच्या ओळखीचे होते. पूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, राहुलच्या स्वभावामुळे तिने ब्रेक अप केले. त्यानंतर युवतीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरविले. आरोपीशी कोणताही संपर्क न ठेवता त्याला विसरून जाण्याचा निर्णय तिने घेतला होता.२८ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान आरोपीने युवतीला त्रास दिल्याचा आरोप आहे.threat suicide सिताबर्डीतील टेंपल बाजार रोडवरील गणराज हॉटेलजवळील ओम साई गर्ल्स हॉस्टेलसमोर येऊन आरोपीने युवतीच्या होणाऱ्या पतीला जीवे मारण्याची आणि स्वतः आत्महत्या करेल, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या युवतीने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सिताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८(३५१)(२) तसेच भादंविच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीणकुमार डहाळे पुढील तपास करीत आहेत.