महिनाभरात सोन्याचे दर २२ हजारांनी घसरले; खरेदीची हीच योग्य वेळ?

लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा; तज्ज्ञांचा टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करण्याचा सल्ला

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
gold prices गेल्या महिनाभरात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली असून, प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल २२ हजार रुपयांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. लग्नसराईचा हंगाम जवळ येत असतानाच दरात झालेल्या या घसरणीमुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्याच्या घसरणीनंतर लगेच सोने खरेदी करावे की दर आणखी कमी होण्याची प्रतीक्षा करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

gold prices 
 
 
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक योग्य ठरू शकते. तज्ञांच्या मते अमेरिकेतील महागाईविषयक चिंता आणि फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य व्याजदर धोरणाबाबतची अनिश्चितता यांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम १ लाख १७ हजार ९०० रुपयांची पातळी महत्त्वाची मानली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम एक लाख रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी नमूद केले. लग्नकार्य किंवा वैयक्तिक गरजांसाठी सोने घेणाऱ्यांनी सध्याच्या घसरणीचा फायदा घेण्याचा विचार करावा, मात्र खरेदी वेगवेगळ्या टप्प्यांत करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, सोन्याच्या किमती आणखी कमी होतील या अपेक्षेने खरेदी फार काळ लांबवणेही जोखमीचे ठरू शकते. काही तज्ज्ञांच्या मते, २०२७ मध्ये सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.gold prices आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव, डॉलरचे मूल्य, रुपयातील चढ-उतार, व्याजदर आणि जागतिक आर्थिक तसेच राजकीय घडामोडी यांचा भारतीय बाजारातील किमतींवर थेट परिणाम होतो. त्यामुळे सध्याच्या दरघटीकडे खरेदीची संधी म्हणून पाहता येईल; मात्र भविष्यातील दरांचा अंदाज बांधून मोठी आर्थिक जोखीम घेणे टाळावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.