प्रफुल्ल व्यास
वर्धा,
tribal-development राज्यातील १ हजार ९७ शाळांमधील दीड लाख आदिवासी विद्याथ्र्यांमध्ये क्रीडा कौशल्य, जीवनकौशल्य आणि रोजगारक्षमता विकसित करण्यासाठी क्रीडा उत्कृष्टता, जीवनकौशल्य आणि रोजगारक्षमता हा एकात्मिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्यांना शालेय शिक्षणासोबतच क्रीडा, जीवनकौशल्य आणि रोजगारक्षमतेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल सीईओ जयंत रस्तोगी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
या प्रकल्पात राज्यातील ५०० शासकीय आश्रमशाळा, ३९ एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि ५५८ अनुदानित आश्रमशाळा अशा १ हजार ९७ शाळांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे दुर्गम व आदिवासी भागातील दीड लाख विद्याथ्र्यांना शालेय स्तरापासूनच क्रीडा क्षेत्रासोबतच इतर विविध क्षेत्रांतील आधुनिक व करिअरच्या संधींचा प्रत्यक्ष लाभ होणार असल्याचा विश्वास लीना बनसोड यांनी तरुण भारतसोबत बोलताना व्यक्त केला.
या एकात्मिक उपक्रमाची रचना सहावी ते आठवीच्या विद्याथ्र्यांसाठी जीवनकौशल्य विकासावर भर दिला जाईल. सहावी ते दहावीच्या विद्याथ्र्यांसाठी क्रीडा गुणवत्ता ओळख व विकास हा टप्पा राबविला जाईल, ज्यामध्ये विद्याथ्र्यांमधील क्रीडा गुणांची पारख करून त्यांची शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाईल आणि निवडक खेळाडूंना विशेष प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देऊन जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार केले जाईल. नववी ते बारावीच्या विद्याथ्र्यांसाठी करिअर व रोजगारक्षमता विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्याथ्र्यांना केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा विज्ञान आणि फिटनेस यांसारख्या संलग्न क्षेत्रांतील शैक्षणिक व रोजगाराच्या संधींची माहिती देऊन त्यांना स्वावलंबी बनविले जाणार आहे. विद्याथ्र्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासह त्यांना आत्मविश्वासपूर्ण आणि रोजगारक्षम नागरिक बनविण्याच्या दिशेने हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले.