काळे कपडे, काळे फलक अन् अनोख्या वेशभूषेतून मनपाच्या कारभाराचा निषेध

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-municipal-corporation नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर मनपाच्या कारभाराविरोधात नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. काळे कपडे, काळा फेटा आणि कपाळावर काळा टिळा लावून नगरसेवक शैलेश पांडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांच्या हातातील फलकांवरील घोषणांनीही लक्ष वेधले. 'नगरसेवक से अच्छे ठेकेदार बननो' तसेच 'देश में महगाई बड़ने से 12% दो और फाईल लो ' अशा उपरोधिक घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन त्यांनी मनपाच्या कारभारावर निशाणा साधला.
 
nagpur-municipal-corporation
 
सभागृहाबाहेर नगरसेवक शैलेश पांडे यांच्यासह स्नेहलताई ठाकरे आणि मंजुषाताई चाचेरकर यांनीही मनपाच्या धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीने विरोध दर्शविला. काळ्या वेशभूषेतून आणि उपरोधिक फलकांमधून प्रशासनाच्या कथित काळ्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने मनपा परिसरात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.