OTT ची नंबर वन वेब सीरिज! ना खून खराबा, ना सस्पेन्स-थ्रिलर!

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
panchayat-best-ott-seriesओटीटीवर सध्या क्राइम, मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स आणि थरारक कथांवर आधारित वेब सीरिजची मोठी चलती आहे. मात्र, याच सगळ्यापेक्षा वेगळी आणि प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करणारी एक वेब सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये ना सस्पेन्स आहे ना मर्डर मिस्ट्री. एका गावातील सुंदर गोष्ट आहे. गावातील साधी माणसं, त्यांचे विचार, नाती, त्यांच्यात घडणारं गावातलं राजकारण हे सगळं यात पाहायला मिळतं.
 

panchayat 
गेल्या काही वर्षांपासून ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सीरिजपैकी ही एक वेब सीरिज आहे. IMDb वरही या सीरिजला 10 पैकी 9.0 रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे डोक्याला कोणताही ताण न देता काही बघायचं असेल तर ही वेब सीरिज तुमच्याचसाठी आहे. आपण बोलत आहोत ती वेब सीरिज म्हणजे 'पंचायत'. अभिषेक त्रिपाठी हा इंजिनिअरिंग पदवीधर तरुण आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात असताना त्याला पंचायत सचिवाची नोकरी मिळते. शहरात राहून करिअरची स्वप्नं पाहणाऱ्या अभिषेकला नोकरीसाठी गावात यावं लागतं. मात्र, गावातील परिस्थिती त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असते. वीज, पाणी, रस्ते, सरकारी योजना आणि ग्रामपंचायतीचं राजकारण अशा अनेक गोष्टींशी त्याला सामना करावा लागतो.
'पंचायत' या वेब सीरिजची सुरुवात 3 एप्रिल 2020 रोजी झाली. आतापर्यंत या सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले असून एकूण 32 एपिसोड आहेत. IMDb वर या सीरिजला 9.0 रेटिंग मिळाली आहे. या सीरिजच्या यशामागे कलाकारांच्या अभिनयाचा मोठा वाटा आहे. जितेंद्र कुमार याने अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. नीना गुप्ता मंजू देवी, रघुबीर यादव प्रधानजी, फैसल मलिक प्रल्हाद चाचा आणि चंदन रॉय विकासच्या भूमिकेत दिसतात. याशिवाय सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवर, अशोक पाठक आणि पंकज झा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयातून फुलेरा गावातील पात्रांना जिवंत केलं आहे.
'पंचायत' या सीरिजची निर्मिती द वायरल फीवर यांनी केली आहे. दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार हे या सीरिजचे क्रिएटर्स आहेत. आतापर्यंतचे चारही सीझन अमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत. या सीरिजचा पाचवा म्हणजे 'पंचायत सीझन 5' हा 3 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. फुलेराला आता नवी प्रधान मिळाल्यामुळे गावातील राजकारण आणि वातावरणात बदल होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्याचप्रमाणे सचिव आणि रिंकीचं लग्न होणार का हेही पाहणं इंटेरेस्टिंग ठरणार आहे.