कॉफी डे कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार!

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
sebi-coffee-day-forensic-auditसिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनलच्या निर्देशांनुसार, बाजार नियामक 'सेबी'ने कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी एका फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली आहे.
 

coffee day 
कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या सात उपकंपन्यांमधून ३,५३५ कोटी रुपयांचा निधी कंपनीच्या प्रवर्तकांशी संबंधित असलेल्या 'म्हैसूर अमॅलगमेटेड कॉफी इस्टेट्स लिमिटेड' कंपनीकडे बेकायदेशीररीत्या वळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची नव्याने, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आदेश सॅटने ५ नोव्हेंबर रोजी सेबीला दिले होते.