ये प्रेम मोल लिया'च्या प्रमोशनदरम्यान शर्वरीच्या खास लूकने वेधले लक्ष

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
मुंबई,
sharvari-black-anarkali-lookबॉलीवूड अभिनेत्री शर्वरी आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही चर्चेत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमधील तिचे फोटो नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारी शर्वरी अनेकदा आपले खास फोटो शेअर करत असते. नुकतेच तिचे काळ्या रंगाच्या पारंपरिकड्रेसमधील फोटो समोर आले आहेत.
 

sharvari vagh 
या फोटोशूटमध्ये शर्वरीने काळ्या रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस घातला आहे. लांब आणि भरपूर घेर असलेल्या या ड्रेसमध्ये तिचा लूक अधिक आकर्षक दिसत आहे. काळ्या अनारकली ड्रेससोबत शर्वरीने त्याच रंगाचे छोटे जॅकेट घातले आहे. या जॅकेटवर केलेले सोनेरी नक्षीकाम तिच्या संपूर्ण लूकची शोभा वाढवत आहे.
शर्वरीच्या जॅकेटवर सोनेरी धाग्यांनी सुंदर फुलांची नक्षी काढलेली आहे. विशेषतः जॅकेटच्या बाह्यांवर आणि खांद्यांवरील नक्षीकाम अधिक उठून दिसत आहे. या ड्रेससोबत शर्वरीने सोनेरी नक्षीकाम असलेली छोटी काळी पर्सही घेतली आहे. ड्रेस, जॅकेट आणि पर्स यांची रंगसंगती तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत आहे.
या लूकसाठी शर्वरीने केसांचा नीट बन बांधला आहे. हलका मेकअप आणि मोजक्या दागिन्यांमुळे तिचा चेहरा अधिक खुलून दिसत आहे. कधी कमरेवर हात ठेवून, तर कधी खाली पाहत शर्वरीने कॅमेऱ्यासमोर सुंदर पोझ दिल्या आहेत. काळ्या ड्रेसमधील तिचा हा साधा पण स्टायलिश लूक लक्ष वेधून घेत आहे. शर्वरी सध्या तिच्या आगामी, सूरज बडजात्या दिग्दर्शित 'ये प्रेम मोल लिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत दिसणार असून, चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.