सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकतर्फी विजय

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
सोलापूर,
solapur-bank-election-bjp-victoryसोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने दणदणीत विजय मिळवत बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सोलापूर जिल्हा बँकेतील १९ पैकी १० जागा या बिनविरोध झाल्या असून भाजप सत्ता स्थापन करणार असल्याची चिन्हे आहेत. तरीदेखील उर्वरित ९ जागांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
solapur
 
जिल्हा बँकेतील एकूण १९ जागांपैकी १० जागा बिनविरोध जिंकल्यानंतर मतमोजणी झालेल्या ९ जागांपैकी बहुतांश जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलने बाजी मारत १८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे, माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवत मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व राखले.
 
माळशिरसमध्ये मोहिते-पाटलांचे वर्चस्वभाजप पुरस्कृत पॅनलने मोठी आघाडी घेतली असली, तरी माळशिरस सोसायटी मतदारसंघातून मोहिते-पाटील गटाने आपली ताकद दाखवून दिली. माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून मोहिते-पाटील गटाचे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजयाची नोंद करत या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र, उर्वरित बहुतांश जागांवर मोहिते-पाटील पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला.
 
दुसऱ्या निकालात सांगोला सोसायटी मतदारसंघातून भाजप प्रणित पॅनलचे उमेदवार आणि शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख विजयी झाले. त्यांनी मोहिते-पाटील गटाचे उमेदवार संजय इंगोले यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुलाल उधळून आनंद साजरा केला.