छत्रपती संभाजीनगर,
suspicious death येथील एमजीएम महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा निवासी वसतिगृहात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२६ नोव्हेंबर) उघडकीस आली. निकिता राजू गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची नांदेड येथील रहिवासी होती. शहरातील एमजीएम गंगा वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर ती अन्य दोन विद्यार्थिनींसोबत राहत होती. या घटनेमुळे वसतिगृह परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास निकिता झोपेतून उठली होती. मात्र, तिने महाविद्यालयात जाण्यास नकार दिल्याने तिच्या दोन्ही मैत्रिणी वर्गासाठी निघून गेल्या. सायंकाळी साडेचारच्या सुमारास परतल्यानंतर त्यांनी निकिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा दूरध्वनी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीची पाहणी केली. यावेळी मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर निकिता खोलीत मृतावस्थेत आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरून पोलिसांनी निकिताचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.suspicious death पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास करण्यात येत असून शवविच्छेदन अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.