बुलढाणा,
tulshi-vivah गेल्या वर्षी तरुण भारतच्या शतकी वर्षानिमित्त तुळशी विवाहाचे आवाहन करण्यात आले होते आणि त्यानिमित्त सहभागीना तुळशी विवाह किट देण्यात आली होती. विद्या गणेश पाटील यांनी तुळशी विवाहाचे आयोजन केले होते यावर्षी सुद्धा या आवाहनाला प्रतिसाद देत तानाजी नगर महिला मंडळाच्या वतीने सांस्कृतिक, पारंपारिक नृत्य सादर करून महाप्रसादाचे आयोजन दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले होते.

तुळशी विवाह हा पवित्र तुळशीच्या रोपाचा भगवान विष्णू यांच्याशी केला जाणारा पारंपरिक धार्मिक विवाह सोहळा आहे. हा सोहळा दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमेदरम्यान, प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला साजरा केला जातो. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे या सोहळ्यानंतर हिंदू धर्मातील विवाह व इतर शुभ कार्यांना सुरुवात होते. तरुण भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात तुळशी विवाह आयोजन केले . विद्या पाटील यांच्या कल्पकतेतून सुंदर सजावट करण्यात आली मंगलाष्टाकांच्या सुरेल स्वरात विवाहसंपन्न झाला. याप्रसंगी तानाजी नगर महिला मंडळ व नागरिक सहभागी झाले होते.