शांतीनगर शाळेच्या मुद्यावर मनपात अशांती

२.४७ कोटींचे थकीत भाडे वसूल करण्याचा प्रश्न ऐरणीवर; ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याचा प्रस्ताव

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
नागपूर,
shantinagar-school-issue नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या शांतीनगर शाळा परिसरातील तीन रिक्त इमारती पोलिस विभागाला कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याच्या विषयावर मनपाच्या आमसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
 
 
विषय क्रमांक ४० अंतर्गत व्यायामशाळा, गुणवत्ता कक्ष आणि उर्दू प्राथमिक शाळेची (G+1) इमारत पोलिस विभागाला नाममात्र एक रुपया शुल्क आकारून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या तीन इमारतींचे एकूण क्षेत्रफळ २४९.३८ चौ.मी. असून, ३६०.९६ चौ.मी. मोकळ्या जागेसह यापूर्वी ११ महिन्यांच्या तात्पुरत्या भाडेतत्त्वावर शांतीनगर पोलिस स्टेशनला देण्यात आल्या होत्या. मात्र, २०१८ मध्ये मुदत संपल्यानंतरही पोलिस विभागाने इमारतींचा ताबा सोडलेला नाही. ९ डिसेंबर २०१८ ते ८ मार्च २०२७ या कालावधीतील २ कोटी ४७ लाख १७ हजार २६२ रुपयांचे भाडे थकीत असून, त्याची वसुली अद्याप झालेली नाही.
 
दरम्यान, शिक्षण सभापती संतोष देवी लढा यांनी सांगितले की, मागील सभेत या विषयाला सर्वांची संमती होती. मनपा जागा विकत नसून, ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर अटी व शर्तींसह देण्याचा प्रस्ताव आहे. शाळा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. पोलिस चौकीसाठी जागा देणे ही चांगली बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, थकीत भाडे आणि जागा हस्तांतरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात वातावरण तापले.