हिंगणघाट,
vhps-nationwide विश्व हिंदू परिषदेतर्फे भारतात २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत देशव्यापी हितचिंतक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरात ५ कोटी हितचिंतक जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर वर्धा जिल्ह्यातही अभियानाला उत्साहात सुरुवात झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे ३०० पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यातील विविध भागांत हिंदू समाजापर्यंत पोहोचणार आहेत. समाजातील नागरिकांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची माहिती देऊन अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. वयाची १५ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना केवळ २० रुपये शुल्क भरून विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक होता येणार आहे.
हिंदू समाजाचे संघटन, धर्मसंस्कृतीचे संवर्धन, सामाजिक समरसता आणि राष्ट्रहिताच्या कार्यात आपलेही योगदान असावे, या भावनेतून प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे. हिंदू समाजाची एकजूट हीच आपली शक्ती असून, प्रत्येक व्यक्तीचा सहभाग संघटनात्मक बळ वाढविण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ५ कोटी हितचिंतकांच्या संकल्पपूर्तीसाठी वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक हिंदू बांधवाने पुढाकार घ्यावा आणि या अभियानाला व्यापक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषद, वर्धा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.