कार दुचाकी अपघातात महिला गंभीर जखमी

    दिनांक :27-Nov-2026
Total Views |
कारंजा लाड,
car-two-wheeler-accident कारंजा-दारव्हा मार्गावर दुपारी अपघाताची घटना घडली. या अपघातात तरनोळी येथील मोनाली चावके या जखमी झाल्या. कारंजा येथून तरनोळी कडे जात असताना रेल्वे फाटकाजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका चालकांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
 
 
car-two-wheeler-accident
 
या अपघाताची माहिती अंकुश ठोंबरे यांनी संदेश मेश्राम यांना दिली. माहिती मिळताच आई एकवीरा रुग्णवाहिकेचे चालक शिवम खोंड, दादाजी रुग्णवाहिकेचे चालक रोहित छोटमल, संदेश मेश्राम आणि छोटू उके यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमी मोनाली चावके यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दिग्रस येथे हलविण्यात आले. यावेळी छोटू उके, शिवम खोंड, शाम घोडेस्वार, विनोद खोंड, छोटू बेलखेडे आणि तेजस ठाकरे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अपघात कसा घडला याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही.