8th-pay-commission-cost-reportआठव्या वेतन आयोगाबद्दल टेन्शन वाढवणारा अहवाल समोर आला आहे. एक वर्षापूर्वी 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेला आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आणि लागू झाल्यावर कोणत्या स्तरावर व किती पगार वाढणार याची आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा होती. पण आता 8 वा वेतन आयोग लागू करणे सरकारला वाटतं तितकं सोपं नसल्याची बातमी आली आहे.
Deutsche बँक रिसर्चच्या अहवालानुसार, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला पुढील आर्थिक वर्षात किमान 3 लाख कोटी रुपये अधिक द्यावे लागतील. त्यामुळे, वित्तीय तुटीवर अतिरिक्त दबाव येईल.
या वाढलेल्या खर्चामुळे वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3% वर कायम राहू शकते. पण, सरकारी तिजोरीवर दबाव आणणारा आठवा वेतन आयोग एकमेव घटक नाही असेही अहवालात पुढे म्हटले असून कच्च्या तेलाच्या सातत्याने वाढलेल्या किमती, वाढत्या अनुदानाच्या आवश्यकता आणि रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या लाभांशात संभाव्य घट यांचाही सरकारच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे आंतरराष्ट्रीय बँकेने सांगितले.
अशाप्रकारे, आठवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीवर खर्च होणारी रक्कम सरकारला रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या 2.9 लाख कोटींच्या संभाव्य लाभांशपेक्षाही जास्त असेल. पण आकडे वेगवेगळ्या आर्थिक वर्षांशी संबंधित असून पगारवाढीसाठी थेट आरबीआयच्या लाभांशातून निधी दिला जाईल, असा याचा अर्थ नाही.