अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची धडक मोहीम

धरणातील कृषीपंप, केबल, पाइप जप्त

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
वाशीम,
illegal-water-extraction जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के असून, केवळ मृतसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पशुधनासाठी तसेच परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा असल्याने अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे.
 
 
illegal-water-extraction
 
मालेगाव तालुयातील मुंगळा लघु पाटबंधारे योजनेवर २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेल्या अवैध पाणी उपसा प्रतिबंधक पथकाने सकाळपासून सायंकाळपर्यंत कारवाई केली. यापूर्वी महावितरण विभागाने अवैध विद्युत जोडण्या खंडित केल्या होत्या. मात्र, त्या पुन्हा जोडून पाणी उपसा सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पथकाने धरणावरील कृषीपंप, पाइप व केबल काढण्याची कारवाई केली. पांगरी, मुंगळा व खेर्डी येथील शेतकर्‍यांनी १०० टक्के मोटारी, केबल व पाइप स्वतः काढून नेले. हे साहित्य वाहून नेण्यासाठी सुमारे २० ते २५ ट्रॅटरचा वापर करण्यात आला.
 
 
कळंबा महाली लघु पाटबंधारे योजनेत ट्रॅटरद्वारे पाणी उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अवैध पाणी उपसा प्रतिबंधक पथकाने धरणाच्या सर्व बाजूंनी गस्त घातली. या तपासणीत एकही ट्रॅटर अथवा विद्युत मोटार आढळून आली नाही. सोनखास व झाकलवाडी शिवारातील धरणालगतच्या विद्युत जोडण्या १५ नोव्हेंबर रोजी खंडित करण्यात आल्या होत्या. मात्र, मागील दोन दिवसात या जोडण्या पुन्हा सुरू झाल्याने शेतकर्‍यांकडून अवैध पाणी उपसा होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सोनखास लघु पाटबंधारे योजनेत केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने संबंधित शिवारातील विद्युत जोडण्या पुन्हा खंडित करण्याची कार्यवाही महावितरण विभागाने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, चिखली बु. ग्रामपंचायत हद्दीत अवैध पाणी उपसा करून खासगी टँकरद्वारे पाणी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा बोअरवेलपासून ५०० मीटरच्या आत तीन ठिकाणी अवैध पाणी उपसा करून टँकरद्वारे विक्री सुरू असल्याचे आढळले.
 
 
धरणातील उपलब्ध मृतसाठा जतन करण्यासाठी अवैध पाणी उपसा रोखण्याची कारवाई सुरू राहणार आहे. धरणावर पुन्हा मोटार, पाइप किंवा केबल आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकर्‍यांनी पाणीसाठा जतन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.