AI रिसर्चरच्या एका इशाऱ्याने जगभरात खळबळ!

2027 या आगामी वर्षात कोरोनापेक्षा गंभीर परिस्थिती येण्याची शक्यता

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
ai-warning-2027-risksकृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आपली कामं झटपट करत आहे. अनेक तासांचं काम एका क्लिकवर होत आहे. पण यामुळे मोठी चिंताही निर्माण झाली आहे. अनेक तंत्रज्ञान तज्ज्ञ AI मुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी इशारा देत आले आहेत. असंच AI रिसर्चरने निकोला जुर्कोविच यांनी गंभीर इशारा दिला आहे. त्याच्या या इशाऱ्याने खळबळ माजली आहे. निकोला जुर्कोविच यांच्यानुसार 2027 या आगामी वर्षात कोरोनापेक्षा गंभीर आणि वाईट परस्थिती होऊ शकते. निकोला यांनी आपल्या कुटुंबाला किमान दोन आठवड्यांसाठी पुरेसा रेशनचा साठा, पाणी आणि रोख रक्कम घरात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
 

AIII 
सोशल मीडियावर शेअर केलं पत्र
निकोला जुर्कोविच हे ‘METR’ नावाच्या एका ना-नफा संस्थेत तांत्रिक कर्मचारी आहेत; ही संस्था प्रगत एआय प्रणालींशी संबंधित जोखमींचा अभ्यास करते. निकोला यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक खुले पत्र शेअर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एआयचा वेगाने वाढणारा प्रभाव पाहून त्यांना अनेक वर्षांपासून चिंता वाटत आहे. आता या विषयावर जनतेशी मोकळेपणाने बोलण्याची वेळ आली आहे, असे त्यांना वाटते.
आपल्या पत्रात निकोलाने लिहले आहे की, आपण पुढचं वर्ष बघू की नाही, याबद्दल त्याला पहिल्यांदाच शंका वाटत आहे. निकोलाच्या मते, एआय (AI) प्रणालींनी यावर्षी अनेक मोठ्या कंपन्यांचा डेटा चोरून आधीच मोठे नुकसान केले आहे. आतापर्यंत हे नुकसान केवळ आर्थिक स्वरूपाचे राहिले आहे, परंतु पुढच्या वर्षापर्यंत म्हणजेच २०२७ पर्यंत यामुळे मानवी जीवनालाही धोका निर्माण होऊ शकतो.
सांगितली प्रमुख तीन कारणं
निकोलाने एआयमुळे निर्माण होणाऱ्या जोखमींची तीन प्रमुख कारणेही स्पष्ट केली आहेत. पहिले कारण असे की, एआय नियंत्रणाबाहेर जाऊन एखाद्या राष्ट्राच्या महत्त्वपूर्ण प्रणाली हॅक करू शकते. दुसरे कारण म्हणजे, एखादी व्यक्ती एआयचा वापर करून जैविक शस्त्रे विकसित करू शकतात. तिसरे कारण असे की, जागतिक नेते यंत्रांच्या हाती अतिप्रमाणात सत्ता सोपवू शकतात.