बुलढाणा,
amravati-police-sports-meet-2026बुलढाणा येथे २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या ३७ वी अमरावती परिक्षेत्रीय पोलिस क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अकोला संघाच्या पुरुष गटाने सर्वसाधारण विजेते पद पटकावले असून महिलांचे सर्वसाधारण विजेते पद यवतमाळ संघाने संपादन केले.येथील पोलिस कवायत मैदानावर संपन्न झालेल्या ३७ व्या अमरावती पोलिस क्रिडा स्पर्धेच्या बक्षीस समारंभा प्रसंगी अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.महेश पाटील, पोलिस आयुक्त अमरावती शहर राकेश ओला, यवतमाळ पोलिस अधिक्षक कुमार चिंत्ता, अकोला पोलिस अधिक्षक आर्चित चांडक, अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक निकेतन कदम, वाशिम पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे, बुलढाणा पोलिस अधिक्षक निलेश तांबे, जिप मुकाअ भालचंद्र चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये विजय संघाना गौरवचषक व पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत पुरुषांमध्ये सर्वसाधारण विजेते पद अकोला जिल्हा(२०६), द्वितीय अमरावती (१५४), तृतीय बुलढाणा (९७) तर महिलांमध्ये यवतमाळ जिल्हा (१३२) द्वितीय अकोला (१२५), तृतीय अमरावती ग्रामीण (१०८) पटकावले आहे. फुटबॉल मध्ये अकोला जिल्ह्याने विजेते पद पटकावले असून बुलढाणा संघ उपविजयी ठरला.
हॉकीमध्ये अमरावती शहर विजयी, अकोला उपविजेता, हॅण्डबॉल अमरावती शहर विजयी, अमरावती ग्रामीण उपविजयी, कब्बडी पुरुष अकोला विजयी, अमरावती ग्रामीण उपविजयी, व्हॉलीबॉल पुरुष अमरवती शहर विजयी यवतमाळ उपविजयी, बास्केट बॉल पुरुष अकोला विजयी, अमरावती ग्रामीण उपविजयी, खोखो (पुरुष) अमरावती ग्रामणी विजयी, अमरावती शहर उपविजयी, कब्बडी (महिला)अमरावती ग्रामीण विजयी, अकोला उपविजयी, व्हॉलीबॉल (महिला) यवतमाळ विजयी, अकोला उपविजयी, बास्केट बॉल (महिला), अकोला विजयी, यवतमाळ उपविजयी, खोखो (महिला)अकोला विजयी, यवतमाळ उपविजयी तसेच ट्रिपल जम्प शर्यतीत अमरावती ग्रामीणच्या आकाश इंदूरकर याने प्रथम क्रमांक, लांब उडी व १०० मीटर धावणे क्रिडाप्रकारात यवतमाळच्या शिफा कॉझी हिने प्राप्त केला.
यासर्व विजयी संघाना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्याहस्ते गौरवचषक व पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विजयी संघ राज्यस्तरावर अमरावती विभागाचे नेतृत्व करणार आहेत.