अमरावतीत येणार ६४ विद्यापीठांच्या महिला चमू

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धा

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
अमरावती,
amravati-womens-handball-tournament-2026संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ स्पर्धेचे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर १ ते ४ डिसेंबर दरम्यान महिला हँडबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा या राज्यातील ६४ विद्यापीठांच्या चमू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी २८ सामने खेळल्या जातील व दुसऱ्या दिवशी ३२ सामने खेळल्या जाईल, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
 

tournament 
स्पर्धेचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते राहणार असून, उद्घाटक म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त नयना गुंडे, पोलिस आयुक्त राकेश ओला, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक अविनाश पुंड, भारतीय विद्यापीठ संघाचे सहसचिव (क्रीडा) डॉ. सिंकू कुमार सिंह यांच्यासह अन्य उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ४ डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह अन्य मान्यवर राहतील. समारंभात स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला स्पर्धा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष दिलीप इंगोले, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या प्र. संचालक डॉ. तनुजा राऊत, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, स्पर्धेच्या समन्वयक डॉ. पुष्पलता देशमुख आदी उपस्थित होते.