३०० रुपये न दिल्याने विद्यार्थ्याला नापास करण्याची धमकी

शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
नागपूर,
case-registered-against-female-teacher शाळेच्या कार्यक्रमासाठी ३०० रुपये न दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याला परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार नागपुरातील बिशप कॉटन स्कूलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
case-registered-against-female-teacher
 
मंजूषा गेडाम (४६) असे आरोपी शिक्षिकेचे नाव असून त्या व्हीआयपी रोडवरील बिशप कॉटन स्कूलमध्ये कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दहावीचा वर्ग सुरू असताना शिक्षिकेने एका विद्यार्थ्याकडे शाळेतील कार्यक्रमासाठी ३०० रुपये मागितले होते. मात्र, विद्यार्थ्याला पैसे देणे शक्य झाले नाही.
 
यामुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला पैसे न दिल्यास परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आला. त्याने घरी जाऊन घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.